आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामूहिक विवाह:इज्तेमात 64 जाेडप्यांचे सामूहिक विवाह, अन मानवजातीसाठी दुवा

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चऱ्हाटा फाटा परिसरामध्ये दाेनदिवसीय इज्तेमा कार्यक्रम हाेत आहे. पहिल्या दिवशी पहाटे सहापासून विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. सायंकाळी या परिसरामध्ये दहा जाेडप्यांचा सामुदायिक विवाह साेहळ्यामध्ये निकाह झाला. दुसऱ्या दिवशी पहाटे सहापासून कार्यक्रम सुरू झाले. मुख्य धर्मगुरूंच्या मार्गदर्शनानंतर ५४ जाेडप्यांचे निकाह झाले. दाेनदिवसीय इज्तेमामध्ये ६४ जाेडप्यांच्या रेशीमगाठी जुळल्या. सायंकाळी लाखाे भाविकांच्या उपस्थितीमध्ये अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी दुवा करण्यात आली. त्यानंतर इज्तेमाची सांगता झाली.

इज्तेमामध्ये विविध मुस्लिम धर्मगुरूंनी प्रेषित मोहंमद पैगंबरांच्या आचारविचारांची पेरणी करत सामाजिक जडणघडणीसह प्रेषितांच्या विचारांवर चालण्याचे उपस्थित लाखो भक्तांना उद्बोधन केले. प्रेषित मोहंमद पैगंबरांचा यकीन करो, हा मूलमंत्र जपा, चांगले काम-चांगले विचार अंगीकारत मानवजातीचे कोटकल्याण करण्यासाठी अल्लाहने दाखवून दिलेल्या मार्गावर चाला, असे मूलमंत्र दिले.

बातम्या आणखी आहेत...