आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळणी परीक्षा:644 विद्यार्थ्यांनी दिली बार्टीची प्रवेश परीक्षा ; स्पर्धा परिक्षांचे दिले जाणार मार्गदर्शन

बीड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मान्यता प्राप्त सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राकडून चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेकरिता एकूण ७०२ विद्यार्थ्यांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तब्बल ६४४ विद्यार्थ्यांनी शहरातील तंत्र निकेतन महाविद्यालयात ही चाळणी परीक्षा दिली.

ही चाळणी परीक्षा जात पडताळणी विभागाच्या उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बीड संगीत मकरंद, शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. लोहोकरे, प्रा. सुहास वीर सम्राट, प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सचिव राहूल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १५० कर्मचाऱ्यांनी काम पाहिले. त्यामुळे ही चाळणी परीक्षा अतिशय सुरळीत पार पडली. दरम्यान, या परीक्षेतून पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना बँक, रेल्वे, एलआयसी, लिपीकवर्गीय व तत्सम पदाच्या स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन केले जाणार आहे. केंद्र सहाय्यक प्रा.अविनाश वडमारे, प्रा.अमोल क्षीरसागर, प्रा. भरत खेत्री, प्रा. शिवाजी रुपनर, प्रा.देवेंद्र कांबळे, प्रा.प्रतीक्षा हिवरकर, प्रा. सूरज साळवे, प्रा. दीपक सोनवणे यांनी ही परिक्षेचे नियोजन केले.

बातम्या आणखी आहेत...