आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:बीड जिल्ह्यात 65 वर्षीय वृद्धाचा भोसकून खून; मृतदेहाशेजारी सापडली चिठ्ठी; त्यातील मजकुराने खळबळ

शिरूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतात गेलेल्या ६५ वर्षीय वृद्धाचा भोसकून खून केल्याचा प्रकार शिरूर तालुक्यातील आनंदगावमध्ये शनिवारी सकाळी उघडकीस आला. दरम्यान, मृतदेहाशेजारी एक चिठ्ठी मिळून आली असून यामध्ये ‘माझ्या पत्नीचा खून झाला असून मारेकरी गजाआड होइपर्यंत खूनाचे सत्र सुरू राहील’ असा मजकूर लिहलेला आहे.

कुंडलिक सुखदेव विघ्ने (६५) असे खून झालेल्या वृ़द्धाचे नाव आहे. शेतातील उन्हाळी पिकांचे वन्यजीवांपासून रक्षण करण्यासाठी ते शुक्रवारी रात्रीच शेतात मुक्कामी गेले होते. शनिवारी सकाळी उशिरापर्यत ते घरी न आल्याने मुलाने शेतात जाऊन शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, या प्रकारानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस निरीक्षक सिद्धार्थ माने, सहायक निरीक्षक रामचंद्र पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

तपासासाठी चार पथके
या खुनाच्या तपासासाठी चार पथके तयार केली आहेत. श्वानपथक व ठसे तज्ज्ञांनाही पाचारण केले होते. तालुक्यात मागील काही दिवसांत कोणत्याही महिलेचा खून झालेला नाही. चिठ्ठीतून दिशाभूलही करत खुन्याचा प्रयत्न असू शकतो. सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
-सिद्धार्थ माने, पोलिस निरीक्षक, शिरूर कासार

बातम्या आणखी आहेत...