आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाची तांत्रिक चूक:बीएस्सीच्या 67 विद्यार्थ्यांना हॉलतिकीट नाही, पीआरएन नंबरवर दिली परीक्षा

आष्टी4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यापीठाच्या बीए, बीकॉम आणि बीएस्सीच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेला सुरूवात झाली असून आष्टी येथील भगवान महाविद्यालयात मंगळवारी दुपारी दोन वाजता बीएस्सीचा पेपर असताना ६७ विद्यार्थ्यांच्या हाती चक्क परिक्षेचे हॉलतिकीटच पडले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांत एकच गांेधळ सुरू झाला. हे पाहुन महाविद्यालयाच्या केंद्र प्रमुखांनी थेट विद्यापीठाशी संपर्क साधुन माहिती देताच विद्यापीठाने तांत्रिक चुक मान्य करत पीआरएन नंबर टाकुन विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी बसवले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी दुपारी २ ते ५ यावेळेत परीक्षा दिली.

शहरातील भगवान महाविद्यालयात मंगळवारी पहिल्याच दिवशी बी.एस्सी,बी.ए.,बी.काॅम द्वितीय वर्षाच्या मराठी, हिंदी आणि इंग्रजीच्या पेपरला दुपारी दोन वाजता सुरूवात होणार होती. तीनही वर्षाच्या परीक्षेसाठी एकूण २४७ विद्यार्थी परीक्षा देणार होते. त्यासाठी या महाविद्यालयात ३५ विद्यार्थ्यांसाठी एक हॉल या प्रमाणे नऊ हॉलची व्यवस्था करण्यात आली. २४७ पैकी केवळ बीएस्सी द्वितीय वर्षाच्या एकुण ६७ विद्यार्थ्यांची परीक्षा एक तासावर असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून आॅनलाईन हाॅल तिकीट उपलब्ध झाले नव्हते. परीक्षा तासाभरावर आली आली तरी हाती हॉलतिकीट न पडल्याने या विद्यार्थ्यात एकच गोंधळ उडाला. शेवटी परीक्षा केंद्र प्रमुख एस.आर.कर्डुळे यांनी परिस्थिती पाहुन थेट विद्यापीठात संपर्क केला. तेव्हा विद्यापीठाने पीआरएन नंबर टाकून परीक्षा देण्याच्या सुचना दिल्या.

विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही
विद्यापीठाने तीन वाजेपर्यंत हाॅलतिकीट आपलोड केले असुन काही तांत्रिक अडचणीमुळे ६७ विद्यार्थ्यांचे हाॅल तिकीट परिक्षेच्या पूर्वी आले नव्हते. पंरतु विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नसून त्यांनी आजचा पेपर दिला आहे.एस.आर.कर्डूळे,परिक्षा केंद्र प्रमुख,भगवान महाविद्यालय, आष्टी

बातम्या आणखी आहेत...