आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीत रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यात ८३.८१% एकूण मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. यात, ४ लाख १८ हजार महिलांनी तर, ४ लाख ८६ हजार पुरुषांनी मतदान केले. महिलांच्या मतदानाची टक्केवारी ८२.५८ टक्के इतकी आहे तर, पुुरुषांच्या मतदानाची टक्केवारी ८४.८८ टक्के इतकी आहे.
जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचातींसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली होती. या पैकी ६७१ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता जिल्ह्यात मतदान शांततेत झाले. आज निकाल लागणार आहे. दरम्यान, रविवारी मतदानासाठी सकाळपासून उत्साह दिसून आला. जिल्हाधिकारी कार्यालयाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात एकूण ५ लाख ६ हजार ५८५ महिला मतदारांपैकी ४ लाख १८ हजार ३५९महिलांनी मतदान केले. तर, ४ लाख ८६ हजार ३० जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
तालुकानिहाय असे मतदान
बीड-८४.६०%, आष्टी-८४.७३, पाटोदा-८३.१८, शिरुरकासार-८५.११, गेवराई -८४.६८, माजलगाव - ८५.६२, धारुर -८३.१७, वडवणी-८३.३४, केज-८४.१३, अंबाजोगाई -८०.९२, परळी - ८२.७७ बीड जिल्हा एकूण - ८३.८१%
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.