आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुदत संपणाऱ्या २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका तालुक्यात पार पडत आहेत. या अनुषंगाने उमेदवारांनी २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज सादर केले असून निवडणुकांची पुढील प्रक्रिया पार पडली. आता तालुक्यात २४ ग्रामपंचायतीत एकूण ६९ उमेदवार थेट सरपंचपदासाठी निवडणूक लढवत आहेत तर २४ ग्रामपंचायतीमधील २२२ सदस्य पदासाठी ४८६ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. पॅनल ठरले चिन्ह मिळाले. कित्येक पॅनलचे प्रचाराचे नारळ देखील फुटले असून यामुळे निवडणूक रंगत वाढत जात आहे. शिरूर तालुक्यामध्ये एकूण ५२ ग्रामपंचायती आहेत. यामधील २४ ग्रामपंचायतीची मुदत डिसेंबर महिन्यात संपणार होती.
या अनुषंगाने २४ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम देखील प्रारंभ झालेला असून निवडणुकांची रंगत सध्या गाव गाड्यात पाहण्यासाठी मिळत आहे. थेट जनतेमधून सरपंच पद निवडले जाणार असल्याने २४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ६९ उमेदवार निवडणूक मैदानात नशीब आजमावत आहेत. सरपंचपद थेट जनतेतून निवडले जाणार असले तरी उपसरपंच पदासाठी देखील रस्सीखेच चालणार असल्याने सदस्य पदावर देखील प्रत्येक जण बसण्याच्या कुवतीनेच निवडणूक मैदान गाजवत आहे. सरपंचपद थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायतीमधून अपक्ष एकला चलो रे या भूमिकेतून अनेक उमेदवारांनी थेट सरपंच पदाच्या अर्ज भरलेले आहेत तर अनेक ग्रामपंचायतीमध्ये दुरंगी,तिरंगी व चौरंगी लढती सुरू असून लढतीची रंगत हळूहळू वाढत असून राजकीय पक्ष प्रतिष्ठा पणाला लावत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रमुख लढती आष्टी व बीड विधानसभा मतदारसंघात विभागलेल्या शिरूर कासार तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत विविध राजकीय पक्षांनी नशिब आजमावलेले आहे. यामध्ये जवळपास बहुतांश ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्या पॅनलच्या निवडणुका सरळ सरळ होत असून शिवसेना, मनसे शिवसंग्राम यांनीही आपले पॅनल निवडणूक मैदानात उतरवलेले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.