आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल:टाकळी शिवारात ७ जुगारी पकडले; दुचाकींसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

केज5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाकळी (ता. केज) शिवारात नागपंचमी सणाच्या दिवशी तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या सात जणांना केज पोलिसांनी छापा मारून पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडील जुगाराचे साहित्य व नगदी ७५ हजार ७२० रुपये व घटनास्थळी असलेल्या ३ लाख ५३ हजार रुपये किमतीच्या दुचाकी असा ४ लाख २८ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

टाकळी ( ता. केज ) शिवारात नागपंचमी सणाच्या दिवशी पत्याचा डाव खेळण्याची प्रथा पडली आहे. त्यानुसार सणाच्या दिवशी अनेक जण शिवारातील पडीक जमिनीत जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व केज ठाण्याचे प्रभारी सपोनि संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार राजेश पाटील, जमादार अशोक थोरात, चाँद पाशा सय्यद, अतुल जोगदंड, बाळू सोनवणे, महादेव बहिरवाल, सानप यांच्या पथकाने २ ऑगष्ट रोजी दुपारी ४.१५ वाजेच्या सुमारास छापा मारला.

यावेळी पोलिसांना पाहून काही जण पळून गेले तर फुलचंद चांगदेव घुले, शिवाजी दगडू माने, विष्णू रावसाहेब बारगजे, शिवम श्रीराम बारगजे, बाबासाहेब नरहरी घुले, ऋषिकेश दत्तात्रय घुले, अंकुश नवनाथ घुले यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व नगदी ७५ हजार ७२० रुपये जप्त करण्यात आले. तर पोलिसांनी घटनास्थळी मिळून आलेल्या ३ लाख ५३ हजार रुपये किमतीच्या दुचाकी असा ४ लाख २८ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बातम्या आणखी आहेत...