आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाेरी:दासखेडात 70 हजारांचे सोयाबीनचे कट्टे चाेरी

बीड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटोदा तालुक्यातील दासखेडमधून ७० हजार रुपयांचे सोयाबीनचे कट्टे चोरी झाल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सुवराज परमेश्वर कोकाटे (५४ रा. दासखेड) यांनी शेतातून सोयाबीन काढून त्याचे २७ कट्टे आपल्या घरासमोर ठेवले होते.

शनिवारी पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी हे ७० हजार रुपये किंमत असलेले हे कट्टे लंपास केले. सकाळी चोरीचा हा प्रकार काेकाटे यांच्या लक्षात आला. त्यांनी या प्रकरणी पाटोदा ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. यावरुन चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद केला.

बातम्या आणखी आहेत...