आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेज येथील न्यायालयात ठेवण्यात आलेल्या लोकन्यायालयात प्रलंबित ७३ फौजदारी व दिवाणी प्रकरणे समापोचाराने व आपसात तडजोडीने निकाली काढण्यात आली. तर ३२ लाख ९ हजार ८८१ रुपयांची वसूली झाली असल्याची माहिती दिवाणी न्यायाधीश बी. एस. संकपाळ यांनी दिली.
केज येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ७ एप्रिल रोजी लोकन्यायालय ठेवण्यात आले होते. त्यात प्रलंबीत दिवाणी व फौजदारी स्वरुपाचे १८६७ प्रकरणे व इतर २९४ दाखल पुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. तर ४ पॅनल करण्यात आले होते. पॅनल प्रमुख म्हणून तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश बी. एस. संकपाळ, सह दिवाणी न्यायाधीश मनीषा थोरात, २ रे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस.व्ही. जंगमस्वामी, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश ए. व्ही. देशपांडे यांनी काम पाहिले. यावेळी पक्षकारांनी आधिकाधीक प्रकरणे सामोपचाराने मिटवावीत असे आवाहन न्या. संकपाळ यांनी केले.
लोकन्यायालयात प्रलंबित ७३ फौजदारी व दिवाणी प्रकरणासह ११ दाखल पुर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. तर ३२ लाख ९ हजार ८८१ रुपयांची वसूली झाली. प्रलंबीत दावे दाखल पुर्व प्रकरणे, बँक कर्ज प्रकरणे, धनादेशाची प्रकरणे, घरगुती कौटुंबिक वाद, पोटगी प्रकरणे व तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे सामोपचाराने व आपसात तडजोडीने निकाली निघाली. सुत्रसंचालन अॅड. एस. बी. मस्के यांनी तर आभार अॅड. डी. टी. सपाटे यांनी मानले. लोक न्यायालयाच्या यशस्वितेसाठी केजचे न्यायाधीश, वकील संघाचे पदाधिकारी, सदस्य, बँक अधिकारी, पोलिस प्रशासन, न्यायालयातील कर्मचारी यांची परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.