आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारंवार मागणी:राज्यातील 738 बीएएमएस डॉक्टर पदोन्नतीच्या प्रतीक्षेत ; डॉ. दीपक राऊत यांची माहिती

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील बीएएमएस डॉक्टरांच्या पदोन्नतीचा प्रश्न मागील २३ वर्षांपासून प्रलंबित आहे. पात्र असतानाही व वारंवार मागणी करूनही शासनाकडून पदोन्नती मिळत नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये कमालीचा संताप निर्माण झाल्याची माहिती महाराष्ट्र वैद्यकीय अधिकारी महासंघाचे बीड जिल्हा सचिव डॉ. दीपक राऊत यांनी दिली.

२००४ ते २००९ मध्ये वैद्यकीय अधिकारी गट अ संवर्गातील हजारो पदे रिक्त होती. त्या वेळी बीएएमएस पदवी असलेल्या ७३८ जणांची अस्थायी वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली होती. १२ ते १६ वर्षे वैद्यकीय सेवा दिल्यानंतर ११ जानेवारी २०१९ रोजी ७२८ जणांची सेवा गट ब संवर्गात समाविष्ट करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी गट अ, गट ब एकाच समान पातळीवर वैद्यकीय सेवा देतात. तरीही त्यांना देण्यात येणारी वेतनश्रेणी व सेवाविषयक लाभ भिन्न आहेत. यामुळे गट ब संवर्गातील बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याची रोषाची भावना आहे. वैद्यकीय अधिकारी गट ब संवर्गात एकूण १२८५ पदे मंजूर आहेत. गट ब संवर्गात पदोन्नतीसाठी ८५० वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. आरोग्य संचालकांनी गट ब संवर्ग अधिकाऱ्यांची पदोन्नतीस पात्र असलेली यादी अर्धवट जाहीर केल्याचा आरोप आहे. यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. रिक्त पदे व अनुशेषाचा विचार करता गट ब संवर्गातील कार्यरत सर्व वैद्यकीय अधिकारी पदोन्नतीस पात्र आहेत. सर्व गट ब अधिकाऱ्यांची नावे समाविष्ट करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

राज्यस्तरावर आंदोलन करू बीएएमएस डॉक्टरांची पदोन्नती २३ वर्षांपासून रेंगाळलेली आहे. यासाठी आता लवकरच राज्यस्तरावर आंदोलन करू - डॉ. दीपक राऊत, सचिव, महाराष्ट्र वैद्यकीय अधिकारी महासंघ.

बातम्या आणखी आहेत...