आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आझाद मैदान:75 स्वातंत्र्यसैनिक 75 झेंडे खांद्यावर घेऊन करणार आझाद मैदानावर धरणे

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यानिमित्त देशभरामध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. या अमृतमहोत्सवामध्ये “आम्ही पारतंत्र्यात जिंकलो, मात्र स्वातंत्र्यात हरलो’ अशा संतापजनक शब्दांमध्ये भावना व्यक्त करत स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या पाल्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे बेमुदत आंदोलन १७ सप्टेंबरपासून मुंबई येथील आझाद मैदानावर केले जाणार आहे, अशी माहिती स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे राज्य सचिव अप्पासाहेब शिंदे यांनी दिली.

बीड शहरामधील स्वातंत्र्यसैनिक भवन येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शिंदे यांनी माहिती दिली. या वेळी राज्याध्यक्ष भाऊसाहेब सोळंके, उपाध्यक्ष जवाहरलाल सारडा यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ स्वातंत्र्यसैनिक ७५ झेंडे खांद्यावर घेऊन मुंबई येथील हुतात्मा चौक ते मंत्रालयापर्यंत पायी चालत राष्ट्रघोष करणार आहेत. तसेच मंत्रालयातील तिरंग्याला मानवंदना देऊन रांगेमध्ये उभे राहून राष्ट्रगीत म्हटले जाणार आहे.‌ त्यानंतर भारत माता की जय आणि वंदे मातरम या दोन घोषणा देऊन शांततामय वातावरणात पुन्हा आंदोलन करण्यासाठी सर्व ७५ स्वातंत्र्यसैनिक रवाना होणार आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत दैनंदिन आंदोलन केले जाईल.

या बेमुदत आंदोलनाची राज्य सरकारने वेळीच दखल घेऊन प्रश्न निकाली काढावा, असा इशारा स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे राज्य सचिव अप्पासाहेब शिंदे यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...