आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत तपासणी:जीवनदायी सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिराचा 76 रुग्णांनी घेतला लाभ

बीड12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड शहराच्या भाजी मंडई भागातील जिव्हाळा बेघर निवारा केंद्रात जीवनदायी सामाजिक संस्थेच्या वतीने व जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये अंध, दिव्यांग वयोवृद्ध, मनोरुग्ण असलेल्या रुग्णांची जिल्हा रुग्णालयाचे डॉ. दिनेश तुपे, डॉ. अश्विनी कदम, फार्मसी ऑफिसर अश्विनी उबाळे, सिस्टर्स उषा राठोड यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उपस्थित रुग्णांची तपासणी केली. योग्य ते औषधोपचार त्यांना दिले. या कार्यक्रमाच्या प्रारंभी जीवनदायी सामाजिक संस्थेचे सचिव यश वंजारे, जिव्हाळा बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक राजू वंजारे, संचालक अभिजित वैद्य, शालिनी परदेशी, कल्याण गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शिबिरामध्ये जवळपास ७६ रुग्णांनी मोफत तपासणीचा लाभ घेतला. डॉ. दिनेश तुपे, डॉ. आश्विनी कदम, अश्विनी उबाळे, राजू वंजारे, अभिजित वैद्य, शालिनी परदेशी यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करून संस्थेने रंजल्या, गांजल्याची सेवा करण्याचे आवाहन या वेळी केले. या आरोग्य शिबिरात जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील महिला, पुरुष लाभार्थींची मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिजित वैद्य यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...