आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:जैतापूरमध्ये 80 दात्यांनी शिबिरात केले रक्तदान; आरोग्य शिबिरामध्ये 500 हून अधिक तपासणी

दिंदूड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​जैतापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ८० दात्यांनी रक्तदान केले. तर आरोग्य तपासणीही केली गेली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भागवत दराडे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन केले होते.

आरोग्य तपासणी शिबीरात ५००, नेत्र तपासणी शिबीर १३५ तर मुळव्याध तपासणी शिबीरात ३९ गरजुंची तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन भागवत दराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर सर्व रोग आरोग्य तपासणी शिबीरास खुपच मोठा प्रतिसाद मिळाला.

आरोग्य शिबिरात रूग्णांची तपासणी करण्यासाठी डॉ.राहुल मुंडे, डॉ.श्रीराम मुंडे यांच्यासह इतर डॉक्टरांनी दिवसभर तपासणी केली. तसेच मुळव्याध तज्ञाकडुन मुळव्याधी रूग्ण तपासणी करण्यात आली. याउपक्रमांचा जैतापुर, देवठाणा, फकीर जवळा, मुंगी, चिखली आदि गावच्या नागरिकांनी लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नामदेव नागरगोजे, धनराज चौरे, भारत नागरगोजे, योगेश सोळंके, पवन भिंगे, चंदू जोंधळे, आनंद जोगदंड, दत्ता जाधव, बाळासाहेब खेडकर, रोहित वैरागे, कृष्णा खाडे, भरत केकान, गोविंद गिते, सचिन धुर्वे, सुलतान चाऊस, आदिंनी परिश्रम घेतले.

दरम्यान, या वेळी भागवत दराडे यांचा मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना दराडे यांनी यापुढेही विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याचे सांगितले. नागरिकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...