आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक आयोगाने:नवीन शिक्षक मतदारांसाठी 80 हजार फाॅर्म मिळणार

बीड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२३ मध्ये मुदत संपणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्यासाठीचा कार्यक्रम १४ जुलै २०२२ रोजी जाहीर केलेला आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी सुरू होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे ८० हजार नवीन मतदार नाेंदणीसाठी फार्म उपलब्ध हाेणार आहेत. १ नोव्हेंबर २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित विभागातील शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादी तयार करण्यात येणार आहे.

दर सहा वर्षांनी होणाऱ्या विधान परिषद सदस्यत्वासाठीच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्यात येते. १ ऑक्टोबर २०२२ ला कार्यक्रमाची सूचना प्रसिद्ध होणार आहे. याच दिवसापासून औरंगाबाद विभागाच्या मतदारसंघासाठी मतदार नोंदणी सुरू होणार आहे. ७ नोव्हेंबरपर्यंतच दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिली.

मतदार यादीचा कार्यक्रम
मतदार यादीवर २३ नोव्हेंबर २०२२ ते ९ डिसेंबर २०२२ या काळात दावे व हरकती दाखल करता येणार. २५ डिसेंबर २०२२ ला दावे व हरकती निकाली काढून पुरवणी यादी तयार करणार. ३० डिसेंबर २०२२ ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. मतदार यादीत अर्ज नमुना क्र. १९ द्वारे नावनोंदणी करावयाची आहे. दावे व हरकती ७ नोव्हेंबरपर्यंतच स्वीकारण्यात येतील. जिल्ह्यातील १ नोव्हेंबर २०२२ या अर्हता दिनांक विहित निकषानुसार पात्र मतदारांनी त्यांचे अर्ज नमुना नं. क्र. १९ मध्ये भरून आपले नाव मतदार यादीत नोंदवावेत.

बातम्या आणखी आहेत...