आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज:धारूर कृउबाच्या निवडणुकीसाठी 81 उमेदवारी अर्ज झाले दाखल

धारूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत १८ जागेसाठी ८१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्जाची मंगळवारी छाननी होईल .

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी पर्यंत ८१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. दाखल झालेल्या अर्जामध्ये सेवा संस्था मधून ११ जागेसाठी ४९ अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायतच्या ४ जागेसाठी १७ अर्ज, व्यापारी मतदारसंघातून २ जागेसाठी १० अर्ज, हमाल मापाडी १ जागेसाठी ५ असे एकूण १८ जागेसाठी ८१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

या अर्जावर मंगळवारी रोजी छानणी करण्यात येणार आहे. ७ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार असून पंधरा डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. धारूर बाजार समितीसाठी सध्या मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले असून भाजप आणि राष्ट्रवादी मध्ये रंगत होण्याचे चित्र दिसत आहे. बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते तयारीला लागले आहेत. आपलेच कसे उमेदवार निवडून येतील याची गणिते बांधण्यात सुरुवात झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...