आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

85 हजार पारितोषिक‎‎ ‎:सोनपेठला क्रिकेट स्पर्धेचे‎ विटेकरांच्या हस्ते उद्घाटन‎

सोनपेठएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोनपेठ येथे जिल्हा परिषदेचे माजी‎ अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या हस्ते‎ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष‎ शरदचंद्र पवार यांच्या‎ वाढदिवसाच्या निमित्ताने क्रिकेट‎ स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी (१९‎ डिसेंबर) करण्यात आले.‎ माजी नगराध्यक्ष चंद्रकांत‎ राठोड, रितेश काळे, दशरथ‎ सूर्यवंशी, विठ्ठलराव सूर्यवंशी,‎ सपोनि संदिप बोरकर,‎ मुख्याधिकारी विठ्ठल केदारे,‎ लक्ष्मीकांत देशमुख, सुमंत वाघ,‎ मदनराव विटेकर, श्रीकांत विटेकर,‎ संजय राख, श्रीराम भंडारे,‎ राजेभाऊ सावंत, मधुकर निरपणे,‎ रंगनाथ रोडे, केशव भोसले,‎ तुकाराम भालेकर, डिगांबर‎ भाडूळे, श्रीराम वांकर, शाम‎ पंपटवार, सुनिल बर्वे आदीची‎ यावेळी उपस्थिती होती.

यावेळी‎ महाराष्ट्राच्या व्हॉलीबॉल संघामध्ये‎ तालुक्यातील खडका येथील निवड‎ झालेली विद्यार्थिनी पूनम यादव‎ यांचाही सत्कार यावेळी करण्यात‎ आला. दरम्यान या क्रिकेट स्पर्धेचे‎ प्रथम पारितोषिक ८५ हजार ५५५‎ रूपये, द्वितीय पारितोषिक ५५ हजार‎ ५५५ रूपये आहे. याव्यतिरिक्त‎ उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट‎ फलंदाज, मॅॕन आॕफ द मॅॕच, मॅॕन‎ आॕफ द सिरिज आदी बक्षीसे‎ देण्यात येणार आहेत. क्रिकेट‎ स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कल्पेश‎ राठोड, अशोक भुसारे, सोमनाथ‎ रेडे, गजानन देवरे, असिफ शेख,‎ आदी परिश्रम घेत आहेत.‎ प्रेक्षकांची मोठी हजेरी राहत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...