आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस:कपिलधारच्या यात्रेसाठी 90 जादा बसेस; तीनशेवर पोलिस कर्मचारीही तैनात

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री मन्मथ स्वामी महाराज यांची संजीवन समाधी असलेल्या श्री क्षेत्र कपिलधार येथील कार्तिक पौर्णिमा यात्रोत्सवास आज रविवार पासून सुरुवात होणार आहे. यात्रोत्सवासाठी जिल्हाभरातून ९० जादा बसेस ची व्यवस्था करण्यात आली असून तीनशेवर पोलिस बंदोबस्तासाठी राहणार आहेत. सोमवारी कार्तिक पौर्णिमेला यात्रोत्सवाचा मुख्य कार्यक्रम रंगणार आहे.

वीरशैव समाजाचे श्रध्दा स्थान असलेल्या श्रीक्षेत्र कपिलधार येथे दरवर्षी कार्तिक पौर्णिमा यात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी ६ ते ८ नोव्हेंबर असे तीन दिवस हा यात्रोत्सव आयोजित केला आहे. महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटकातील भाविक मोठ्या संख्येने दाखल होतात. यात्रेसाठी एसटी परिवहन महामंडळाच्या बीड विभागातील आठ आगारातून बसेसचे नियोजन केले आहे. मांजरसुंबा ते कपिलधार घाट माथ्यावरील यात्रा शेड वरुन वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे. बीड आगारातून १५, परळी १५, धारूर १०, माजलगाव ७, गेवराई १०, पाटोदा १०, आष्टी ८, अंबाजोगाई १५ अशा प्रकारे एकूण ९० बसेस ची व्यवस्था कपिलधार यात्रोत्सवासाठी करण्यात आली आहे.

यात्रोत्सवासाठी े एक डीवायएसपी, एक पीआय, १४ अधिकारी, ११५ पोलिस कर्मचारी, १४ महिला पोलिस तसेच दोन दंगल नियंत्रक प्लाटून तर नेकनूर ठाण्याचे पाच अधिकारी व ४० कर्मचारी असे तीनशेच्या वर पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांनी कपिलधार येथे भेट दिली. दुकाने, स्टॉलच्या जागेची त्यांनी पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...