आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:जिल्ह्यात 97.20% विद्यार्थी उत्तीर्ण; वडवणी अव्वल, 286 शाळांचा निकाल 100 टक्के

बीड15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता.१७ जून) जाहीर झाला असून बीड जिल्ह्याने ९७.२० टक्के निकालासह औरंगाबाद बोर्डात पहिला क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यातून ४० हजार ३३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ३९ हजार २०४ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले तर १ हजार १२७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. यासह जिल्ह्यातील २८६ शाळांनी १०० टक्के निकालाची कामगिरी केली.

कोविडचे संकट कमी झाल्यानंतर मार्च २०२२ मध्ये जिल्ह्यातील ४० हजार ३३१ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ३९ हजार २०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये २२ हजार ६२९ विद्यार्थी तर १६ हजार ५७५ विद्यार्थिनींनी यश प्राप्त केले आहे.

सन २०२० प्रमाणेच मुलींचा निकाल सरस राहिला असून मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी मुलांपेक्षा १.४१ टक्क्यांनी अधिक राहिली. विभागात अव्वल आलेल्या बीड जिल्ह्यात यंदा वडवणी तालुक्याने बाजी मारली आहे.वडवणीचा निकाल ९७.८४ टक्के लागला तर सर्वात कमी निकाल धारूर तालुक्याचा आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थ्यांमध्ये पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची लगबग सुरू होणार असून पालकांमध्येही उत्साह दिसून येत आहे.

सन २०२२
वडवणीचा निकाल ९७.८४%
वडवणीचा निकाल ९७.८४ टक्के लागला तर सर्वात कमी निकाल धारूर तालुक्याचा आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थ्यांमध्ये पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची लगबग सुरू होणार असून पालकांमध्येही उत्साह दिसून येत आहे.
दहावीनंतर पुढे जिल्ह्यात अशा संधी
अभ्यासक्रम संस्था प्रवेश संख्या क्षमता
आयटीआय (शासकीय) १२ २०४१
आयटीआय (खासगी) १४ १२०८
तंत्रनिकेतन (शासकीय) १ ३६०
तंत्रनिकेतन (खासगी) १० २७५८
एमसीव्हीसी (शासकीय) २ १८०
एमसीव्हीसी (खासगी) २९ २६८०
विज्ञान शाखा १७१ २२०१०
वाणिज्य शाखा ३१ ३४६०
कला शाखा २३६ २४४३०
दहावी निकालाची उत्सुकता... शुक्रवारी दुपारी एक वाजता दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात आला. आष्टी येथील दिशा काॅम्युटर्सवर हा निकाल पहाण्यासाठी विद्यार्थिनींनी एकच गर्दी केली होती. दिशा काॅम्युटरचे संचालक आसाराम सानप यांनी विद्यार्थ्यांना निकाची प्रिंट मोफत उपलब्ध करून दिली. छाया ः शरद गर्जे
तालुकानिहाय निकाल
तालुका उत्तीर्ण निकाल विद्यार्थी
बीड ९२१० ९७.५७ टक्के
पाटोदा १७९६ ९७.५५ टक्के
आष्टी ३८०३ ९७.४३ टक्के
गेवराई ४४२४ ९७.५५ टक्के
माजलगाव ३४९१ ९६.०३ टक्के
अंबाजोगाई ४३४३ ९७.३७ टक्के
केज ३९९० ९७.१० टक्के
परळी ४००३ ९६.८५ टक्के
धारूर ९८८ ९५.४५ टक्के
शिरूर १६१२ ९६.९३ टक्के
वडवणी १५४४ ९७.८४ टक्के
एकूण ३९२०४ ९७.२० टक्के
१०० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या २०५ ने वाढली
सन २०२० मध्ये जिल्ह्यातील ८१ शाळांचा निकाला हा १०० टक्के लागला होता तर यंदा २८६ शाळांनी १०० टक्के निकालाची मजल गाठली आहे. २४ हजार २३४ विद्यार्थी हे विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत तर ११२९१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३२८८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. २०२२ मध्ये जिल्ह्यातील ४० हजार ३३१ विद्यार्थ्यांनी दहावीची दिली परीक्षा असा वाढला जिल्ह्याचा निकाल रिपीटर्सचा निकाल ७२.९६ टक्के : बीड जिल्ह्यातील १४३९ विद्यार्थ्यांनी दहावीची पुनर्परीक्षा दिली होती. यामध्ये १०५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ७८४ मुले तर २६६ मुलींचा यात समावेश आहे. रिपीटर्सचा निकाल हा ७२.९६ टक्के इतका लागला आहे.
२०१९
८१.२३ टक्के
२०२०
९१.२४ टक्के
९७.२० टक्के

बातम्या आणखी आहेत...