आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन:9 व्या आंबाजोगाई साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रम; दोन कवी संमेलने, दोन परिसंवाद व कथाकथनाचे आयोजन

आंबाजोगाईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

9 व्या आंबाजोगाई साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली असून या संमेलनात दोन कवी संमेलन, दोन परिसंवाद व कथाकथन होणार आहेत. संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ कमलाकर कांबळे आहेत. उदघाटक डॉ. अरुण डावळे असून समारोप सत्रातील प्रमुख पाहुणे भगवानराव शिंदे आहेत. हे संमेलन 16 व 17 ऑक्टोबर 21 रोजी आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात होणार आहे. आंबाजोगाईकरांनी या संमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन स्वागताध्यक्ष कमलताई बरुळे यांनी केले.

२३ निमंत्रीत कवी
ख्यातनाम कवयित्री निशा चौसाळकर यांच्या अध्यक्षते खाली निमंत्रितांचे कवी संमेलन होणार असून त्यात 23 कवींचा सहभाग असणार आहे. राजेंद्र रापतवार, शीलाताई कांबळे, इंदूताई पल्लेवार, संध्या सोळंके-शिंदे, डॉ. देवराव चामनर, बाळासाहेब जोगदंड, प्रा.सारिका गुंडरे, आनंद देशपांडे, रवींद्र पांडे, उषा रामधामी, वर्षा मुंडे-कऱ्हाड, मंजुषा कुलकर्णी, वीणा कुलकर्णी, हाजी अब्दुल खालेख, विनोद निकम, रश्मी मुकद्दम-काळे, डॉ अकिला गौस, वसंत देशमुख, संजय जड, शिल्पा भंडारी, तिलोत्तमा पतकराव, चंदन कुलकर्णी, राजेश रेवले या कवींचा त्यात समावेश असणार आहे. कवी संमेलनाचे सूत्र संचालन प्रा संजय खडप करणार आहेत. सत्राचे संयोजन प्रभाकरराव महानुभाव यांनी केले आहे.

खुले कविसंमेलन
जेष्ठ कवी श्री नागनाथ बडे यांच्या अध्यक्षते खाली खुले कवी संमेलन होणार असून पहिल्या सत्रात बालकवी आपल्या कविता सादर करतील. दुसर्या सत्रात अनेक मान्यवर कवी भाग घेणार आहेत. रेखा देशमुख यांनी या सत्राचे संयोजन केले असून व्यंगकवी भागवत मसने हे सूत्रसंचालन करणार आहेत.

कथाकथन
लोकप्रिय कथाकार श्री गोरख सुजानराव शेंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कथाकथन कार्यक्रमात संध्या शिंदे-सोळंके, सागर कुलकर्णी व अर्चना स्वामी त्यांच्या कथा सांगणार आहेत. या सत्राचे संचालन इंदूताई पल्लेवार करणार असून संयोजन वैजनाथ शेंगुळे यांनी केले आहे.

दोन परिसंवाद
9 व्या आंबाजोगाई साहित्य संमेलनाची मुख्य संकल्पना 'जेष्ठ नागरिक' ही आहे. या संमेलनात आंबाजोगाईतील जेष्ठांचे साहित्य आणि विविध भाषांतील साहित्यातील जेष्ठांचे चित्रण असे दोन परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. आंबाजोगाईतील जेष्ठांचे साहित्य या परिसंवादाचे अध्यक्षस्थान जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष ऍड अनंत जगतकर भूषविणार असून परिसंवादात प्रा. डॉ. शैलजा बरुरे, प्रा. डॉ. देविदास खोडेवाड, डॉ. राजेश इंगोले आणि दगडू लोमटे बोलणार आहेत. या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. सुरेश सोनवळकर व संयोजन अनिकेत डिघोळकर यांचे आहे.

विविध भाषेतील साहित्यात जेष्ठ व्यक्तिंचे चित्रण कसे केले गेले आहे, यावर दुसऱ्या परिसंवादात प्रकाश टाकला जाणार आहे. या परिसंवादाचे अध्यक्षस्थान ख्यातनाम साहित्यिक बालाजी सुतार भूषविणार आहेत. डॉ. वैशाली गोस्वामी, अमृत महाजन, प्रा. डॉ. राजकुमार कांबळे व कलीम अजीम बोलणार असून या सत्राचे संयोजन अनिता कांबळे करीत आहेत. व सूत्र संचालन प्रा. विष्णू कावळे करणार आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रम
आंबाजोगाईच्या जेष्ठ नागरिक संघाने सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम बसवला आहे. हा कार्यक्रम त्यांनी अनेक ठिकाणी सादर केला आहे. दिल्लीत सादर केलेल्या कार्यक्रमाचे मोठे कौतुक झाले होते. तो कार्यक्रम या संमेलनात सादर केला जाणार असून या वेळेस जेष्ठ कलावंतांचे कलादर्शनही होणार आहे. मंगलाताई भुसा आणि श्रीरंग सुरवसे हे संयोजन करीत असून वैशाली भुसा सूत्रसंचालन करणार आहे.

कलादालन
संमेलन परिसरात एक कलादालन असणार आहे. त्यात आंबाजोगाई येथील नामवंत कलाकारांची शिल्पे, चित्रे, फोटो यांची प्रदर्शने असणार असून या कलादालनाचे संयोजन डॉ राहुल धाकडे करीत आहेत. परिसर सजावटीची जबाबदारी वर्षा जालनेकर आणि मुजीब काजी यांनी स्वीकारली आहे.

नातीला पत्र
या संमेलनाच्या निमित्ताने नातीला पत्र अशी पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे संयोजक दगडू लोमटे यांनी सांगितले की, पन्नासहून अधिक जणांनी नातीला पत्र लिहिले असून स्पर्धेचा निकाल समारोप सत्रात जाहीर केला जाईल. आंबाजोगाईच्या रसिक स्वागत सभासदांनी हे संमेलन आयोजित केले असून जेष्ठ नागरिक संघ व मराठवाडा साहित्य परिषदेने त्यात पुढाकार घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...