आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:बेल्टने मारहाण केल्याने 15‎ वर्षीय मुलाची आत्महत्या‎

आष्टी‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी‎ गावातील एकाने बेल्टने मारहाण‎ केल्याने त्याच्या तावडीतून सुटून‎ शेतातील विहिरीत उडी घेऊन १५‎ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची‎ घटना सोमवारी दुपारी आंगलगाव‎ (ता. परतूर) येथे घडली आहे.‎ याप्रकरणी एका जणाविरुद्ध आष्टी‎ पोलिस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत‎ ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात‎ आला आहे. चैतन्य साहेबराव‎ खंदारे (१५) असे मृत मुलाचे नाव‎ आहे.‎ आंगलगाव येथील सुरेश रंजित‎ खंदारे याने सोमवारी दुपारी दीड‎ वाजेच्या सुमारास चैतन्य यास‎ बेल्टने मारहाण करण्यास सुरुवात‎ केली होती. तेव्हा चैतन्य याने‎ त्याच्या तावडीतून सुटुन शेताकडे‎ पळत असताना पळतो कुठे‎ सापडल्यावर आणखी मारीन,‎ असे म्हटल्याने चैतन्य याने भीतीने‎ शेतातील विहिरीत उडी घेऊन‎ आत्महत्या केली. याप्रकरणी‎ साहेबराव भगवान खंदारे यांनी‎ दिलेल्या फिर्यादीवरून आष्टी‎ पोलिस ठाण्यात सुरेश रंजित‎ खंदारेविरोधात गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे.‎