आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहन ‎:आनंद शैक्षणिक संकुलात 22 ‎ फूट उंच रावणाचे केले दहन ‎

आष्टी‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी येथील आनंद चॅरिटेबल संस्था व‎ शेतकरी शिक्षण संस्थेच्या आनंद शैक्षणिक‎ संकुल मध्ये प्रथमच विजयादशमी दसरा‎ निमित्ताने रावण दहन कार्यक्रम आयोजित ‎करण्यात आला होता. २२ फुट उंचीच्या‎ रावणचे दहन यावेळी करण्यात आले.‎ या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे ‎संचालक अजय धोंडे, संस्थेचे प्रशासन ‎अधिकारी डॉ. डी. बी. राऊत यांच्या‎ उपस्थितीत सायंकाळी ७ वाजता हे रावण‎ दहन करण्यात आले. यावेळी बोलताना‎ अजय धोंडे म्हणाले, रावण हा महाृअहंकारी ‎होता. कपटी ,लोभी, माया, रागिट, द्वेषी,‎ मत्सर, स्वार्थी असे दहा विकार त्याच्या अंगी‎ होते.

तुम्ही सर्वानी आपल्याकडे जे विकार ‎असतील त्याचे रावणा सोबत दहन करावे‎ असे ते म्हणाले.‎ संस्थेचे प्रशासन अधिकारी डॉ डी. बी.‎ राऊत म्हणाले, वाईट प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तींनी‎ मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून दसऱ्या‎ दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला.‎ त्याचे प्रतीक म्हणून हा सोहळा अनेक‎ ठिकाणी केला जातो. रामाने रावणाला ठार‎ केले ते सितेचे अपहरण केले म्हणून म्हणून‎ नाही तर रावणातील दुष्ट प्रवृत्तींचे अनुकरण‎ होऊ नये, अशा प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळू नये‎ म्हणून त्याचा वध केला.

यावेळी आनंद‎ शैक्षणिक संकुल मधील डी. फार्मसी ,बी.‎ फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ सुनिल कोल्हे,‎ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम‎ आरसुळ, अन्न तंत्र कॉलेजचे प्राचार्य‎ साईनाथ मोहळकर, इंजिनिअरिंग कॉलेजचे‎ प्राचार्य संजय बोडखे, आयुर्वेद‎ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ चंद्रकांत गोसावी,‎ कृषी तंत्रनिकेतनचे प्राचार्य उध्दव घुले, नर्सिंग‎ कॉलेजचे प्राचार्य सलमान खान यांच्यासह‎ प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी यांची‎ उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...