आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुपोषणाची समस्या:संतुलित आहार हीच खऱ्या अर्थाने आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली : प्रा. डॉ. चेतना डोंगलीकर

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महिला व किशोरवयीन मुलींच्या आरोग्य समस्यांचा दूर करण्यासाठी संतुलित आहार मदत करू शकतो. कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी विविध रानभाज्या, आपल्या शेतात उपलब्ध असलेली ऋतुमानानुसार फळे, पारंपरिक आहार पद्धती व आहार घेण्याच्या योग्य सवयी आवश्यक आहेत. उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती असते. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी संतुलित आहाराबरोबरच योग्य व्यायाम व विश्रांती आवश्यक असते, असे प्रतिपादन प्रा.डॉ.चेतना डोंगलीकर यांनी केले.

गढी येथील जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात गृहविज्ञान विभागाच्या वतीने १ ते ७ सप्टेंबर २०२२ दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुवारी (ता.१ सप्टेंबर) मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. डोंगलीकर या बोलत होत्या. अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदाशिव सरकटे हे उपस्थित होते. प्रास्तविक प्रा. डॉ. राणी जाधव यांनी केले. जागतिक स्तरावर पोषण सप्ताह साजरा करण्यामागील भूमिका, पोषण सप्ताहाचा इतिहास व त्याचे महत्त्व यावर त्यांनी प्रकाश टाकला. दरम्यान, पोषण सप्ताहाच्या निमित्ताने निबंध स्पर्धा, पौष्टिक पदार्थ स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पोषणविषयक जागृती आदी उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...