आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी धर्म आणि नीतीने राज्य केले. परळी वैद्यनाथसह अनेक मंदिरांचा व धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार केला. राज्यकर्त्यांनी राज्यकारभार कसा करावा याचे आदर्श उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असल्याचे मत पालकमंत्री धनंजय मुंडेंनी सिरसाळा येथे व्यक्त केले.
सिरसाळा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री मुंडे बोलत होते. ते म्हणाले, महामानव-महापुरुषांच्या कार्याने सामाजिक क्रांती घडली, त्यांचे विचार महान व युगप्रवर्तक आहेत. त्यांना जाती-पातीपुरते मर्यादित ठेवू नका. विरोधी पक्षनेतेपदी असताना धनगर समाजाच्या आरक्षणाच्या लढाईत विधिमंडळात वेळोवेळी भूमिका मांडली, आजही मी त्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगत मुंडे यांनी शेळी-मेंढीपालन महामंडळाला राज्य सरकारने भरीव निधी द्यावा यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
यावेळी अध्यक्षस्थानी पांडुरंगराव काळे, प्रभाकर नाना वाघमोडे, अजय मुंडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, बाळासाहेब दोडतले, पं.स. उपसभापती जानीमियाँ कुरेशी, राजाभाऊ पौळ, माउली तात्या गडदे, बंडू खांडेकर, व्यंकटेश चामनर, विकास बिडगर, अविनाश धायगुडे, शिवदास बिडगर, बाळासाहेब किरवले, प्रभाकर पौळ, राम किरवले, इम्रान पठाण, वसंत राठोड, संतोष पांडे, नदीम शेख, चंद्रकांत कराड, संजय जाधव, मनोहर केदार, प्रकाश कावळे, विश्वनाथ देवकते, सुरेश कराड, विजय धायगुडे, रुस्तुमराव सलगर, माउली घोडके, देवराज काळे, कार्यक्रमाचे आयोजक ॲड. सतीश काळे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.