आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी:बैलगाडीला दुचाकी धडकली; दोघे जखमी

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऊस वाहतूकीच्या टायर बैलगाडीला पाठीमागून आलेली दुचाकी जोराने धडकली. कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर खांडवी टोलनाक्याजवळ हा अपघात घडला. या अपघातात एका पुरूषासह एक महिला गंभीर जखमी झाली.

कैलास पाटोळे असे जखमीचे नाव असून ते मनुबाई जवळा (ता.गेवराई) येथील रहिवाशी आहेत. पुणे येथून मनुबाई जवळा येथे ते दुचाकीवरून (क्र.एम.एच.१२ एलएल ८४९५) निघाले होते. या दरम्यान खांडवी टोलनाक्याजवळ बैलगाडीला त्यांची दुचाकी धडकली. यात कैलास यांच्या पायाला गंभीर मार लागला. तसेच दुचाकीवर महिलेलाही पायाला मार लागल्याने त्या जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...