आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:मतदानासाठी गावी येत असताना कारचा अपघात ; 1 ठार, 2 गंभीर

गेवराई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे येथून गावी मतदानासाठी येत असताना भरधाव कार ट्रॅक्टरला धडकली. यात एक जण ठार झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये एका जणाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथे घडली. गणेश बाबुराव अडाळे (३०) असे मृत तरुणाचे नाव आहे.

भाटेपुरी येथील गणेश बाबुराव अडाळे (३०), विलास बाबुराव चव्हाण, सीताबाई भास्कर अडाळे व अन्य एक जण पुण्यात स्थायीक असलेले ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावी कारने ( क्र. एम.एच.१४ जी.यु.७०५२) येत होते. पाडळसिंगी जवळ कार ट्रॅक्टरला समोरुन धडकली. हा अपघात वढा भीषण होता की यामध्ये ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले, यात चालक गणेश अडाळे समोर बाजुला बसलेले विलास बाबुराव चव्हाण गंभीर जखमी झाले, तर सीताबाई अडाळे व अन्य एक जण किरकोळ जखमी झाले. अडाळे यास औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान ा मृत्यू झाला.

बीड : मतदान करून परताना शिक्षकाचा अपघाती मृत्यू ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून पुणे येथे निघालेल्या शिक्षकाचा कार अपघातात मृत्यू झाला. किरण रामराव शिंगडे असे मृत शिक्षकाचे नाव आहे. रविवारी मतदान करून ते पुण्याला कारमधून (एम.एच १४, डी.टी.४६५७) एकटेच चालले होते. सांगवी पाटण जवळ समाेरासमोर धडक झाली. अपघातात किरण रामराव शिंगडे यांचा जागीच मुत्यू, तर तीन गंभीर जखमी झाले.

केज : दोन घटनांमध्ये एक ठार, तीन जखमी केज तालुक्यातील साबला येथील परळकर कुटुंब व इतर हे पुण्याहून कारने ( एम. एच. १४ जे. यु. ६७५५) गावाकडे मतदानासाठी येत होते. रविवारी सकाळी पिंपळगाव फाट्यावर ट्रक आणि कारची धडक झाली. या अपघातात चालक सिद्धू कांबळे, सतीश परळकर, सुबिद्रा परळकर हे तिघे गंभीर जखमी झाले. दुसऱ्या घटनेत आनंदगाव (सारणी) येथील श्रीकृष्ण अनिल गायकवाड हा तरुण ठार झाला३ तो औरंगाबाद येथे कामानिमित्त वास्तव्यास होता. शनिवारी तो औरंगाबाद येथून आनंदगावकडे निघाला होता.

बातम्या आणखी आहेत...