आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:टायर फुटून कार पुलावरून कोसळली; 1 ठार, 3 जखमी

आष्टीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानहून देवदर्शन करून परतणाऱ्या जामखेड येथील व्यापारी महेंद्र बोरा यांच्या कारचे टायर फुटल्याने कार नगर-जामखेड मार्गावर वळणावरील पोखरीजवळील पुलावरून खाली काेसळली. या अपघातात व्यापारी महेंद्र बोरा ठार तर कुटुंबातील तीन जण जखमी झाले. त्यांच्यावर नगरच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

जामखेडचे भांड्यांचे व्यापारी महेंद्र शांतीलाल बोरा (५८) हे कुटुंबासमवेत राजस्थानात देवदर्शनाला गेले होते. ते बुधवारी रात्री विमानाने पुणे विमानतळावर आल्यानंतर कारने पुण्याहून पहाटे जामखेडकडे निघाले होते. बुधवारी सकाळी आठ वाजता नगर-जामखेड मार्गावरील पोखरी फाट्याजवळ वळणावर टायर फुटल्याने कार पुलावरून खाली कोसळली. या अपघातात सर्वच जखमींना जामखेड येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या व्यापारी महेंद्र बोरा यांचा मृत्यू झाला, तर पत्नी रेखा महेंद्र बोरा (५२ ), सून जागृती भूषण बोरा (२८) नात लियाशा बोरा (६ ) हे गंभीर जखमी झाले. जखमींना जामखेडच्या समर्थ हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारानंतर नगर येथे हलवण्यात आले. मुलगा भूषण (३४) हा किरकोळ जखमी झाल्याने उपचारानंतर सुटी देण्यात आली

बातम्या आणखी आहेत...