आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्काराचा गुन्हा दाखल:हनुमानगडचे मठाधिपती खाडे यांच्याविरुद्ध गुन्हा, महिलेने केली होती तक्रार

जामखेड6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्ह्यातील हनुमानगडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर, खाडे महाराज यांना मारहाण केल्याप्रकरणी ५ जणांविरोधात खर्डा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पाटोदा तालुक्यातील हनुमानगड येथील मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांच्याविरोधात लग्नाचे आमिष दाखवून जून २०२२ ते १२ जुलै २०२२ या कालावधीत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करत जामखेड तालुक्यातील एका महिलेने तक्रार दिली होती. खाडे यांच्या तक्रारीवरून बाजीराव गिते, भिवा गोपाळघरे, अरुण गिते, राहुल संपत गिते, रामा गिते (रा. मोहरी, ता. जामखेड ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून समाजातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी मिटवण्याचे प्रयत्न केले. खाडे महाराजांना मारहाण झाल्यानंतर जामखेड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्या वेळी कुणालाही भेटू दिले जात नव्हते. त्यानंतर महाराजांना नगर येथे हलवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...