आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापुरुषांच्या जयंती मिरवणुकीत १ ऑगस्ट राेजी घरासमोर डीजे वाजवण्यावरून दोघांमध्ये बाचाबाची हाेऊन त्याचे पर्यावसान वादात झाले. दोन गटाने सार्वजनिक ठिकाणी दगडफेक करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, हे प्रकरण आपसात मिटून घेतले असले तरी पोलिसांनी आरोपींचा गोपनीय शोध घेत १९ जणांवर माजलगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
करण वावळकर, रविराज आठवे, सुमित मोरे, गणेश गायकवाड, शेख मन्सूर शेख अफसर, अफसर खान, अन्नू अन्सारी शेख सलमान व इतर आठ ते दहा जण असे एकूण २० जणांवर मुंबई पोलिस कायदा व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस नाईक गणेश तळेकर हे करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.