आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हा दाखल:नायब तहसीलदारांच्या अंगावर बेशरमाची झाडे फेकून आंदोलन, ३० जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

परळी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेशन कार्डसंबंधी नागरिकांचे अर्ज निकाली न काढल्याने काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनिफ यांनी नायब तहसीलदार बाबूराव रूपनर यांच्या अंगावर बेशरमाची झाडे फेकून अनोखे आंदोलन केले. या प्रकरणी काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूरभाई यांच्यासह ३० जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परळी तहसील कार्यालयात रेशन कार्ड ऑनलाइन, दुरुस्ती करण्यासाठी गत सहा महिन्यांपासून डाटा एंट्री बंद असल्याने रेशन कार्डबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. सर्व्हर चालत नसल्याचे कारण पुढे करत नागरिकांना तहसीलमधून हाकलले जात आहे. चार महिन्यांपूर्वी शहरातील १४०० नागरिकांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष हनिफ यांच्यामार्फत एकाच वेळी तक्रारी दाखल केल्या होत्या. यासह इतर तक्रारी निकाली न काढता २५ ते २७ मार्चदरम्यान तहसील प्रशासनाने राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. संतोष मुंडे यांच्या दवाखान्यासमोर उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजूळ, नायब तहसीलवर बाबूराव रूपनर यांच्या उपस्थितीत फाटलेले, नाव दुरुस्ती व रेशन कार्ड अपडेट करून देण्यासाठी शिबिर आयोजित केले होते. आपल्याच कार्यालयात रेशन कार्डबाबत आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्याऐवजी दबावाखाली येत राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या दारासमोर तहसील प्रशासन आणत राजकीय भूमिका निभावल्याने काँग्रेसने तहसील प्रशासनावर भेदभावाचे आरोप केले होते. याच मागणीसाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनिफ हे मंगळवारी कार्यकर्त्यांसह तहसील कार्यालयात पोहोचले. त्यांनी नायब तहसीलदार बाबूराव रूपनर यांच्या अंगावर बेशरमाची झाडे फेकत निषेध केला. या वेळी नायब तहसीलदारांनी गुन्हा दाखल करण्याची धमकी देताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ तहसील परिसरात तणावाचे वातावरण होते.

३० जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
तहसील कार्यालयातील अव्वल कारकून कालिदास कोंडिराम पवार यांच्या तक्रारीवरून काँग्रेस शहराध्यक्ष बहादूरभाई, गणपत कोरे, शेख जमील शेख लाल, शेख अस्लम फाशा, सय्यद मकसूद गुत्तेदार, सय्यद युनूस मंजूर, शिवाजी देशमुख, बद्रोद्दीन बाबुमियाँ शेख, प्रकाश लक्ष्मणराव देशमुख, सुभाष देशमुख, शेख अमजद लतीफ, रंजित रामराजे देशमुख व इतर अशा ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास परळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...