आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंद:चाटगाव तलावाचा सांडवा फोडल्या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद

दिंद्रुड5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारुर तालुक्यातील चाटगाव येथील तलावाचा सांडवा कुणीतरी अज्ञाताने दहा दिवस अगोदर फोडला होता. मात्र संबंधित पाटबंधारे विभागाच्या शाखाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. ‘दिव्य मराठी’ ने याबाबत वृत्त प्रकाशीत करताच रविवारी सायंकाळी पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी व कर्मचारी सांडवा फुटलेल्या तलावाच्या घटनास्थळी दाखल झाले. संबंधित फुटलेल्या सांडव्याची पाहणी करून दिंद्रुड ठाण्यात शाखाधिकाऱ्यांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला.

धारूर तालुक्यातील चाटगाव येथील तलाव दरवर्षी फोडला जातो. यंदाही हा तलावाचा सांडावा दहा दिवसांपूर्वी फोडला गेला. यामुळे रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. दरम्यान, याकडे शाखा अभियंत्यांकडून दूर्लक्ष करण्यात येत होते.

बातम्या आणखी आहेत...