आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंडा:झेरॉक्स पेपरसाठी रक्कम घेऊन पेपर न देता व्यापाऱ्याची केली फसवणूक, गुन्हा दाखल

बीड4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

झेराॅक्स पेपरसाठी ८४ हजार रुपयांची रक्कम मागवून घेऊन पेपर न देता फसवणूक केल्याचा प्रकार बीडमध्ये समोर आला. या प्रकरणी एका विरोधात शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गोवर्धन परमेश्वर भगत (३६) यांची अनया अॅग्रो फ्रोड्युसर कंपनी आहे. कंपनीच्या कामासाठी त्यांना ए ४ आकाराच्या झेरॉक्स पेपरची आवश्यकता होती. त्यांनी यासाठी आदित्य पटेल या व्यापाऱ्याशी संपर्क केला होता. झेरॉक्स पेपरच्या रिम पाठवण्यसाठी त्यांनी ८४ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर टाकायला सांगितले.

त्याप्रमाणे भगत यांनी पटेल यांच्या खात्यावर पैसे पाठवून त्याची पावती त्यांना व्हॉटस्अॅपवर पाठवली हाेती. यानंतर लगेच तुमचा माल पाठवतो असे त्यांना सांगण्यात आले मात्र प्रत्यक्षात त्यांना माल पाठवला गेला नाही. त्यामुळे फसवणूक झल्याने त्यांनी मंगळवारी शिवाजीनगर पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. यावरुन आदित्य पटेल या व्यापाऱ्या विरोधात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदकरण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक केतन राठोड हे करत आहेत. दरम्यान, यापूर्वीही बीड शहरातील एका व्यापाऱ्याला झेरॉक्स पेपर पुरवठा करतो म्हणून लाखो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार घडला होता.

बातम्या आणखी आहेत...