आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास:व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरणी‎ तीन जणांविरोधात गुन्हा दाखल‎

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्लॉटिंग व्यावसायिकाचे घेतलेले ८ लाख रुपये‎ परत न केल्याने त्याने आत्महत्या केल्याची घटना बीडमध्ये‎ घडली होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत तीन‎ जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा नोंद‎ करण्यात आला. बालेपीर भागात वास्तव्यास असलेले‎ प्लॉटिंग व्यावसायिक शारेख खान गुलदाद पठाण (४५)‎ यांनी २१ फेब्रुवारी रोजी गळफास घेत आत्महत्या केली‎ होती.

आर्थिक अडचणींमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे‎ सांगण्यात आले होते. या प्रकरणी शुक्रवारी त्यांच्या पत्नी‎ शबाना खान यांनी शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली.‎ त्यांच्या तक्रारीनुसार, पती शारेख यांनी प्लॉट घेण्यासाठी‎ नवाज उर्फ उबेद खालेद शेख, खालेद मुसा शेख, हुमेर‎ शेख (सर्व रा. बीड) या तिघांना ८ लाख रुपये हात उसणे‎ दिले होते. वारंवार मागणी करुनही तिघांनी शारेख यांना‎ पैसे परत दिले नाही त्यामुळे ते आर्थिक अडचणीत आले.‎ याला कंटाळून त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली.‎

बातम्या आणखी आहेत...