आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपास:माजी उपसरपंचासह एकावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल ; न्यायालयाच्या आदेशानंतर झाला गुन्हा नोंद

बीड8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायतीत आयोजित मासिक सभेसाठी आपल्या आईला ग्रामपंचायत कार्यालयात सोडण्यास आलेल्या मुलास गतवर्षी मारहाण झाली होती.त्याने माजलगावच्या विशेष न्यायालयात दाद मागितली होती. वर्षभरानंतर या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार माजी उपसरपंच युवराज ठोंबरे यांच्या सह दहा जणांवर दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री ॲट्रॉसिटीसह जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

दिंद्रुड ग्रामपंचायतीत गतवर्षी मासिक सभेत विकास कामावरून दोन गटांत राडा झाला होता. ग्रामपंचायत सदस्या अयोध्या मधुकर देशमाने यांचा मुलगा वैभव देशमाने आपल्या आईला ग्रामपंचायत कार्यालयात सोडण्यासाठी आला होता. या वेळी माजी उपसरपंच युवराज ठोंबरे यांच्यासह मुंजा ऊर्फ मुन्ना ठोंबरे, नागेश ठोंबरे, योगेश ठोंबरे, महेश संदिपान ठोंबरे यांनी वैभव याला लोखंडी गज व काठ्याने मारहाण केली होती. दिंद्रुड पोलिसांनी वैभव देशमाने यांची तक्रार न घेतल्याने त्यांनी माजलगाव विशेष न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार येथील माजी उपसरपंच युवराज ठोंबरे यांच्यासह दहा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला. तपास माजलगावचे प्रभारी पोलिस उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड हे करीत आहेत.