आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन महिन्यांपूर्वी बीड तालुक्यातील बेलगाव-बेलश्वर शिव मंदिरातील पिंडीवरील पंचधातूचा मुखवटा चोरी झाल्याप्रकरणी नेकनूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला हाेता. नेकनूर पोलिसांनी दोन तपास पथके नेमत उस्मानाबाद, लातूर, आणि जालना या जिल्ह्याच्या सरहद्दीपर्यंत जात याचा तपास केला. पण मुखवटा चाेरीच झाला नव्हता तर मंदिराच्या पाठीमागील डोहात असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. पोलिसांनी बेलेश्वर संस्थानच्या मठाधीपतींकडे तो सुपुर्द केला. बेलगाव-बेलेश्वर येथील प्राचीन शिवमंदिरातील महादेवाच्या पिंडीवरील पंचधातूचा मुखवटा, शेष नागाची मूर्ती असे साहित्य २० सप्टेंबर रोजी पहाटे मंदिराचे कुलुप तोडून चोरी गेल्याची तक्रार मठाधिपती महादेव भारती यांनी नेकनूर पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर व उपअधीक्षक संतोष वाळके यांनी घटनास्थळी भेट दिली व नेकनूर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शेख मुस्तफा व पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव यांना तपासाचे दिले होते. परंतु डोहातील पाणी ओसरल्यानंतर गुरुवारी तो मुखवटा एका शेतकऱ्याला दिसला. १ डिसेंबरला नेकनूर ठाण्याचे प्रभारी एपीआय विलास हजारे, उपनिरीक्षक विलास जाधव यांच्या हस्ते बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती महादेव भारती महाराज, तुकाराम भारती महाराज यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे उपस्थित होते. दरम्यान खोडसाळपणातून हा प्रकार केला असावा, असे महादेव भारती महाराज यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.