आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्दी:तुळजापूरला निघालेल्या देवीच्या पलंगाच्या दर्शनासाठी झाली गर्दी

आष्टी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुऱ्हानगर (अहमदनगर) येथून श्री क्षेत्र तुळजापूरकडे निघालेल्या तुळजाभवानी देवीच्या मानाच्या पलंगाचे आष्टी शहरात सकाळी आगमन झाले. यावेळी पलंगाच्या स्वागतासाठी आणि दर्शनासाठी भक्तांची गर्दी होती.

गेल्या ८०० वर्षापूर्वीची यादवकालीन परंपरा असलेल्या देवीचा पलंग साग,आंब्याचे लाकूड या आधारे तयार करण्यात येतो.या पलंगाचे पाचव्या माळेला तुळजापूरकडे प्रस्थान करताे. बुऱ्हानगर अहमदनगर, चिचोंडी, पुंडी, वाहिरा, खुंटेफळ, लोणी, वाटेफळ, आष्टी, जामखेड, तुळजापूर असा या पलंगाचा प्रवास असतो. अहमदनगर येथील बाबूराव पलंगे, गणेश पलंगे हे या पलंगाचे मालक आहेत. भाद्रपद पौर्णिमेला हा पलंग मार्गस्थ होतो. आष्टी शहरात या पलंगाचे आगमन रविवारी आगमन झाले. कसबा पेठेत हरिभाऊ एकशिंगे, अशोक एकशिंगे, देविदास एकशिंगे यांच्या निवासस्थानी या पलंगाचे स्वागत झाल्यानंतर तो दर्शनासाठी उभा केला.एकशिंगे कुटुंबियांची ही आठवी पिढी आहे. घटस्थापनेच्या सातव्या माळेला सकाळी ७ च्या सुमारास आष्टी शहरात हा देवीचा पलंग पोहचतो.

वर्षभर चालते पलंगाचे काम ह्या पंलगाचे काम पलंगे कुटुंब एक वर्षापासून करत असतात. हा पलंग संपूर्ण सागवानी लाकडाचा बनविला जातो तसेच हा पलंग पाचव्या माळेला नगरमधून येतो. सहाव्या माळेला चिंचोडी पाटील, सातव्या माळेला कडा,आष्टी आठव्या माळेला खर्डा तर नवव्या माळेला तुळजापूर येथे पोहोचतो, असे पलंगे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...