आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खळबळ:स्वाराती रुग्णालयातील  शौचालयाच्या बादलीत आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक

अंबाजोगाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात अपघात विभागाच्या शौचालयात दोन दिवसाचे स्त्री जातीचे मृत अर्भक सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी ( ३ डिसेंबर) सकाळी उघडकीस आली. स्वाराती रुग्णालयाचा अपघात विभाग हा नेहमी रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकामुळे गर्दीचा असतो. मात्र शुक्रवारी रात्रीतून अज्ञात महिलेने ३५ नंबर अपघात विभागाच्या शौचालयातील पाण्याने भरलेल्या बकेटमध्ये स्त्री जातीचे अर्भक पाण्यात बुडवून टाकल्याने त्याचा मृत्यू झाला.

शनिवारी सकाळी नऊ वाजता अपघात विभागातील सफाई कर्मचारी शौचालयाची सफाई करत असताना बाळ त्याच्या नजरेस पडल्याने ही घटना उघडकीस आली. याची कल्पना रुग्णालय प्रशासनास मिळताच रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे, अधीक्षक डॉ. राकेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, या घटनेने रुग्णालय परिसरात खळबळ उडाली आहे.

सीसीटीव्ही तपासणार
दरम्यान, हे स्त्री जातीचे अर्भक टाकणारी महिला किंवा आणखी कोणी टाकले ते सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये तपासल्यानंतरच कळणार आहे. त्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही तपासणी सुरु आहे. पंचनामा करुन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.

बातम्या आणखी आहेत...