आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आ.धसांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; आष्टीत 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव

आष्टी14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शालांत प्रमाणपत्र परीक्षा ही सुरुवात आहे. जग हे माहिती तंत्रज्ञानात फार पुढे गेलेले असून त्या ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्याचा हा पहिला टप्पा आहे. या ठिकाणी तुम्ही गुणवंत ठरलात आता खरी ज्ञानप्राप्तीची कसोटी आगामी दोन वर्षांत लागणार आहे. त्यामुळे पुढील परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होऊन गुणवंत होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, याकरिता आज गुणवंतांच्या सत्कार सोहळा होत असल्याचे आमदार सुरेश धस म्हणाले.

आष्टी येथील लक्ष्मी लॉन्समध्ये रविवारी (दि.१९) दहावीच्या परीक्षेत ९० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी प्रमुख ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त आदर्श शिक्षक प्रल्हाद काळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे, उत्तम बोडखे, जिल्हा परिषद सदस्य अमरराजे निंबाळकर, नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्रबुद्धे, माजी नगराध्यक्ष भारत मुरकुटे आदी उपस्थित होते. आमदार धस म्हणाले, १९९७ साली जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था बिकट असल्याचे पाहून आष्टी, पाटोदा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या. जास्तीत जास्त उपक्रम शालेय शिक्षण क्षेत्रात घडवून आणले.

पूर्वी जिल्हा परिषद शिक्षण विभाग शिक्षा म्हणून आष्टी तालुक्यात शिक्षकांना बदलीवर पाठवायचे. यावर आम्ही सकारात्मक पद्धतीने विचार करून जिल्हा परिषदेच्या शाळा, त्यांचे विद्यार्थी, आणि शिक्षक तसेच पालक यांच्यात समन्वय घडवून आणला आणि जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षण जास्तीत जास्त दर्जेदार होईल याकडे लक्ष दिले. त्यामुळे आष्टी, टाकळसिंग, लोणी, आष्टा हरिनारायण, आणि दादेगाव या माध्यमिक शाळांमध्ये आता दर्जेदार शिक्षण मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...