आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीचा हात:दिव्यांग दांपत्याला लाेक-सहभागातून मिळाले घर

अंबाजोगाई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील परळीवेस भागातील दिव्यांग कुटूंबाला लोकसहभागातून बांधून दिलेल्या घराचे नुकतेच हस्तांतरण करण्यात आले. मानवलोक संस्थेसह इतरांच्या सहभागातून दिव्यांग नवनाथ कांबळे यांच्या स्वप्नातील घर उभा राहिले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेहरकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, डॉ. पांडुरंग पवार, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, नायब तहसीलदार मिलिंद गायकवाड, मानवलोकचे सहकार्यवाह लालासाहेब आगळे, सुनिल लोमटे, ॲड. जयसिंग चव्हाण, कल्पना लोहिया, मनोज कदम, अरूण असरडोहकर, अमन लोहिया यांची उपस्थिती होती.

शहरातील परळी वेस भागात नवनाथ कांबळेचे छोटेसे पत्र्याचे घर आहे. त्यांना दोन मुलेही आहेत, त्यांचे शालेय शिक्षण सुरू आहे. नवनाथ हा हार्मोनियम व इतर वाद्य वाजवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. त्यांची पत्नी अविधा नवनाथ कांबळे याही ८० टक्के अंध आहेत. या दांपत्याच्या घराचे पत्रेही गळके झाले होते. भिंती पडायला झाल्या होत्या. अखेर लोकसहभागाने त्यांना पक्के घर मिळाले. अभिषेक दसगावकर, मनोज कदम, भिमसेन लोमटे यांनी निधीसंकलन केले. अनिकेत लोहिया, श्याम सरवदे यांनीही मदतीचा हात दिला.

बातम्या आणखी आहेत...