आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:परळीतील डॉक्टरला दोन कोटींचा गंडा

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वीस कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करतो म्हणून खासगी फायनान्सच्या नावे विश्वास संपादन करून परळीच्या डॉक्टरला तब्बल २ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दहा जणांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. रवींद्र गायकवाड (रा. परळी) असे फसवणूक झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. त्यांचे परळीत हॉस्पिटल आहे. त्याचा विस्तार करण्यासाठी त्यांनी विविध बँकांकडे प्रस्ताव दाखल केले होते. त्यांना २०१७ मध्ये भुज कच्छ फायनान्स कंपनीने २० कोटींचे कर्ज मंजूर करण्याची तयारी दर्शवली मात्र यासाठी १० टक्के रक्कम भरण्यास सांगितली गेली. डॉ. गायकवाड यांनी पैसेही भरले पण कर्ज मिळाले नाही. दिलावर वलीमहोम्मद कक्कल, कासीम शेख, उस्माना नाेडे, लियाकत अली उर्फ राजू पटेल, हाजी भाई, इब्राहिम शेख, रफिक शेख, राजू भाई, रामजी पटेल, हैदर बचाऊ (सर्व रा. कच्छ, गुजरात) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...