आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी:कानडीमाळी येथे विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू ; केज पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

केज25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या गंगाधर लक्ष्मण खाडे ( ६५, कानडीमाळी ता. केज) या शेतकऱ्याचा पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना कानडीमाळी ता. केज) येथे उघडकीस आली. गंगाधर खाडे यांच्या मुलीच्या घरी कार्यक्रम असल्याने त्यांच्या कुटुंबातील सर्व जण हे तीन दिवसांपूर्वी नाशिकला गेलेले होते. तर गंगाधर खाडे हे ८ सप्टेंबर रोजी बैलांना पाणी पाजण्यासाठी शेजारील शेतकऱ्याच्या विहिरीवर पाणी आणण्यास गेले असता पाय घसरून विहिरीत पडले. पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान, १० सप्टेंबर रोजी त्यांची भावजई विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्या असता गंगाधर यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. याची माहिती मिळताच पोलिस नाईक त्रिंबक सोपणे, महादेव बहिरवाल यांनी घटनास्थळी येऊन नागरिकांच्या मदतीने मृतदेह काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. बब्रुवान खाडे यांच्या खबरेवरून केज पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली.

बातम्या आणखी आहेत...