आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:नापिकीमुळे केज तालुक्यात शेतकऱ्याने घेतला गळफास

केज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सततच्या नापिकीमुळे ५६ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरातील स्लॅबच्या हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना चिंचोलीमाळी (ता. केज) येथे शुक्रवारी (१६ डिसेंबर) रोजी सकाळी उघडकीस आली. सुभाष भागोजी राऊत असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. चिंचोलीमाळी (ता. केज) येथील शेतकरी सुभाष भागोजी राऊत यांच्याकडे २ एकर २५ गुंठे जमीन आहे. यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. हातउसने पैसे घेऊन ते पेरणी करायचे. मात्र कधी पावसाची उघडीप आणि काढणीच्या वेळी अतिवृष्टी होत असल्याने शेतीतून उत्पन्न पदरात पडत नव्हते. त्यामुळे त्यांना उसनवारी फेडता येत नसल्याने ते निराश झाले होते. सततच्या नापिकीला कंटाळून सुभाष यांनी टोकाची भूमिका घेतली. गुरुवारी रात्री जेवण आटपून पत्नी व इतर नातेवाइक झोपल्यानंतर मध्यरात्री राहत्या घरातील स्लॅबच्या हुकाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली आहे. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशावरून बिट जमादार राजू गुंजाळ यांनी घटनास्थळी भेट दिली व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.

बातम्या आणखी आहेत...