आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:शाळेसमोर दारू विक्री करणाऱ्याला पकडले,  त्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

केज4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिघोळअंबा (ता. अंबाजोगाई) येथील जिल्हा परिषद शाळेच्या समोर देशी दारू विक्री करणाऱ्या इसमास युसुफवडगाव पोलिसांनी छापा मारून पकडले. त्याच्याकडील ४,२०० रुपयांच्या देशी दारूच्या ६० बाटल्या जप्त केल्या असून त्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

डिघोळअंबा येथील जिल्हा परिषद शाळेच्या समोर रस्त्याच्या कडेला संतोष बाबुराव बोंदर हा देशी दारूची विक्री करीत असल्याची गुप्त माहिती युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहिफळे यांना मिळताच फौजदार रियाजोद्दीन शेख, जमादार सीताराम डोंगरे, रावसाहेब मुंढे, पोलीस शिपाई योगेश समुद्रे यांचे पथक पाठवून दिले. पथकाने ११ डिसेंबर रोजी या ठिकाणी अचानक छापा मारला.

बातम्या आणखी आहेत...