आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्य दिन:अंबाजोगाईत अडीच हजार विद्यार्थ्यांचे शानदार पथसंचलन ; विविध उपक्रमांनी वेधले लक्ष

अंबाजोगाई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई शहरातील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या मोदी लर्निंग सेंटर येथे देखील स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय दिमाखदारपणे साजरा करण्यात आला. सर्व संचलन हे लाल किल्ल्याच्या प्रतिकृतीमध्ये सादर करण्यात आले. यासह संस्थेच्या २५०० विद्यार्थ्यांनी बहारदार पथसंचलन साजरे केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रत्येक राज्यातील विविधता चित्ररथ, नृत्य व वेशभूषा परिधान करून सादर केली.

संस्थेचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी व कार्यकारी संचालक संकेत मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष अॅड.राजेश्वर चव्हाण, प्रा.नानासाहेब गाठाळ, टी.बी.गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी, ज्येष्ठ समाजसेवक गौतमचंद सोळंकी, प्रा.शेट्टी, डॉ.नवनाथ घुगे, प्रा वसंत चव्हाण, प्रा.दामोदर थोरात, महादेव आदमाने, अॅड.संतोष पवार, मनोज लखेरा, किशोर परदेशी, हाजी महेमुद, प्राचार्य प्रविण शेळके, खालेद चाऊस, रोहिणी पाठक, राणा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या या संचलनात मानव विकास मूकबधिर व मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले मूक राष्ट्रगीत व समूह नृत्य हे वैशिष्ट्य पूर्ण असे ठरले. तीन वर्ष वयोगटातील चिमुकल्यानी देखील अतिशय मनमोहक असे संचलन आणि समूह नृत्य सादर केले.

स्वातंत्र्य दिनाच्या पथसंचलनात जोधप्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकधारा, घाटनागनाथ विद्यालयाने गुजरात दर्शन सादर केले. मानव विकास मतिमंद व मूकबधिर विद्यालयाने पंजाब व कोरोनाच्या जोखडातून बाहेर पडल्यानंतर शैक्षणिक भरारी घेणारा विद्यार्थी, न्यू व्हिजन पब्लिक स्कुलमध्ये गोंधळी, आराधी, वासुदेव, पोतराज, ढोल पथक व लेझीम सादर करण्यात आली. डीएड व बीएड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ७५ वर्षातील ७५ राष्ट्रपुरुषांचे सादरीकरण केले. डीफार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय जवान व अतिरेक्यांमधील युद्ध सादर केले . बीसीए व बीबीए महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बहारदार पथसंचलन व प्रात्यक्षिके सादर केली.

ऊर्जा व चैतन्य निर्माण होण्याचे काम झाले
श्री बालाजी शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ही संस्था मागील अनेक वर्षांपासून ज्ञानदानाचे पवित्र असे कार्य करते आहे. यातून आजपर्यंत अनेक उच्च पदस्थ अधिकारी , व्यावसायिक, तथा विविध क्षेत्रातील गुणवंत घडविले. स्वातंत्र्यदिनी अडीच हजार विद्यार्थ्यांच्या पथ संचलनातून उपस्थितांमध्ये ऊर्जा निर्माण झाल्याचे संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत मोदींनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...