आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालिकेवर अत्याचार‎:अंबाजोगाई शहरात मोर्चा‎, मनस्विनीचा पुढाकार; महिला, मुलींचा सहभाग‎

अंबाजोगाई‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पुस येथे ६ वर्षीय‎ बालिकेवर ६० वर्षांच्या नराधमाने‎ केलेल्या अत्याचाराचे शहरात मोठे‎ पडसाद उमटले. मनस्विनी महिला‎ संघटनेने या अत्याचाराच्या निषेधार्थ‎ उपजिल्हाधिकारी कार्यालयावर‎ बुधवारी माेर्चा काढला. शहरातील‎ विविध शाळां महाविद्यालयांतील‎ विद्यार्थी, शिक्षिका, प्राध्यापकासह‎ राजकीय कार्यकर्त्यांनी सहभाग‎ नोंदवत आरोपीस जन्मठेपेची शिक्षा‎ देण्याची मागणी केली.‎ तालुक्यातील पुस येथील एका ६‎ वर्षीय बालिकेला चॉकलेट देण्याचे‎ आमिष दाखवून ६० वर्षीय वृद्धाने‎ अत्याचार केल्याची निंदनीय घटना‎ नुकतीच घडली. याप्रकरणी बर्दापूर‎ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला‎ असून आरोपी विष्णू सादुळे या‎ नराधमास पोलिसांनी बेड्या‎ ठोकल्या होत्या.अत्याचार करण्यात‎ आलेली पिडीत बालिका‎ अंबाजोगाईतील एका शाळेत‎ पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत होती.‎

या संपुर्ण प्रकरणाचा तीव्र निषेध‎ व्यक्त करण्यासाठी तालुक्यातील‎ सर्व महिला संघटना मनस्विनी‎ महिला प्रकल्पाच्या पुढाकाराखाली‎ एकवटल्या असून पुस येथील‎ पिडीत मुलीचे पालक, ग्रामस्थ ,‎ शहरातील विविध महिला संघटना,‎ शाळा, महाविद्यालयामधील मुली,‎ शिक्षक- प्राध्यापक, राजकीय,‎ सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी,‎ राजकीय पक्षांचे नेते यांच्या‎ सहभागासह उपजिल्हाधिकारी‎ कार्यालयावर मोर्चा काढण्यात‎ आला. आरोपी नराधमाला फाशीची‎ शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी‎ करण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...