आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बीड:रुग्णालयाशेजारच्या मेडिकलला मध्यरात्री आग; डॉक्टरचा होरपळून मृत्यू, कंपाउंडर गंभीर जखमी

गेवराई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेवराई शहराजवळील बागपिंपळगाव फाट्यावर घटनेने खळबळ

शहरापासून जवळच बागपिंपळगाव फाट्यावर रुग्णालयाशेजारी असलेल्या मेडिकलला सोमवारी पहाटे आग लागली. यात डॉक्टरचा होरपळून मृत्यू, तर कंपाउंडर गंभीर जखमी झाला. आग कशी लागली, ही घटना कशी घडली याबाबत विविध तर्क लावले जात आहेत. जखमीचा जबाबही पोलिसांनी नोंदवला आहे. सुधाकर भाऊसाहेब चोरमले (३५, जायकवाडी वसाहत) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. बागपिंपळगाव फाट्यावर चोरमले यांच्या दवाखान्याशेजारी मेडिकलही होते. सोमवारी पहाटे दीड ते दोन वाजेच्या सुमारास या मेडिकलला आग लागली. मेडिकलमध्ये सॅनिटायझरसह इतर औषधी, फ्रिज होते. त्यामुळे लगेच आग भडकली. आग विझविण्याच्या प्रयत्नात डॉ. चोरमले हे भाजले व रुग्णालयाच्या गॅलरीतून १५ फूट खाली पडले. त्यांच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. यात त्यांचा मृत्यू झाला. कंपाउंडर सुनील माळी गंभीर जखमी झाला. त्याने जबाबात मेडिकलमध्ये अचानक स्फोट झाला अन् आम्ही उडून बाजूला पडलो, असे सांगितले.

काही अनुत्तरित प्रश्न

या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पहाटे दीड-दोनच्या सुमारास डॉक्टर-कंपाउंडर रुग्णालयात कसे? आग नेमकी कशाने लागली की लावली? आग लागली तर इतर कुणाला का कळवले गेले नाही? मेडिकल चालक मेडिकलमध्ये नव्हता?

0