आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमधील वेगवेगळ्या घटना:विजेच्या तारेला चिकटून दोन चिमुकल्यांसह आई जागीच ठार

गेवराईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घराच्या शेजारी पडलेल्या तारेला चिकटून दोन लेकरांसह आईचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी तांड्यावर शनिवारी दुपारी बारा वाजता घडली. गौरी आगमनाच्या पूर्वसंध्येला या घडलेल्या घटनेमुळे शोककळा पसरली होती. गेवराई तालुक्यातील भेंड टाकळी तांडा येथील महिला ललिता श्रीकांत राठोड(३०) त्यांचा मुलगा अभिजित श्रीकांत राठोड (८) आणि प्रशांत श्रीकांत राठोड (११) अशा तिघांचा राहत्या घराजवळील विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने शॉक बसून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. गौरी आगमनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने राठोड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी तत्काळ भेंडटाकळी तांड्यावर जाऊन राठोड परिवाराचे सांत्वन केले. याप्रकरणी सायंकाळपर्यंत तलवाडा ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान, बीड तालुक्यातील चौसाळा येथे गिझरचा शॉक बसून तारेक अजीज कुरेशी या तरुणाचा मृत्यू झाला. तिसऱ्या घटनेत नळाचे पाणी भरताना पाण्याच्या मोटारचा शॉक लागून प्राजक्ता किशन गायकवाड (१८) या तरुणीचा अंबाजोगाईत मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...