आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राथमिक तपास:जादा पैसे मागणाऱ्या कृषी‎ केंद्रचालकास दिली नोटीस‎

कडा‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रासायनिक खताच्या गोणी मागे‎ तीनशे रुपये जादा घेत असल्याच्या‎ तक्रारी बाबत कडा येथील एका‎ कृषी केंद्र चालकास आष्टी कृषी‎ विभागाने नोटीस बजावली आहे.‎ सध्या रब्बी हंगामातील कांद्याला‎ खत देण्याची वेळ आलेली‎ असताना रासायनिक खते ज्यादा‎ दराने विक्री करून कृषी दुकानदार‎ शेतकऱ्यांची लूट करत‎ असल्याच्या तक्रारी कृषी‎ विभागाला आल्या होत्या. आष्टी‎ तालुक्यात रब्बी हंगामातील‎ उन्हाळी कांद्याचे विक्रमी लागवड‎ झाली आहे. एकीकडे कांद्याला‎ कवडीमोल भाव मिळत असताना‎ शेतकऱ्यांना खते, औषधे यांचा‎ खर्च परवडणे मुश्कील झाले आहे‎ .

कड्यामध्ये वीरेंद्र सिडस या‎ दुकानात चक्क एका गोणीमागे‎ तीनशे रुपये ज्यादा दराने‎ रासायनिक खताची विक्री केली‎ जात असल्याची तक्रार कृषी‎ विभागाकडे शेतकऱ्यांनी केली‎ होती. त्यावर गुरुवारी जिल्हा गुन्हा‎ नियंत्रक अधिकारी एच.डी.गरांडे,‎ तालुका कृषी अधिकारी गोरख‎ तरटे यांच्या पथकाने छापा मारून‎ तपासणी केली असता इफ्को‎ कंपनीचे खताची एक गोणी १४७०‎ रुपये किंमत असताना १७५०‎ रुपयाला विक्री करत असल्याचे‎ प्राथमिक तपासात आढळून आले‎ आहे.

कृषी विभागाच्या पथकाने‎ वीरेंद्र सीडस या दुकानाची‎ तपासणी केली असता साठा‎ रजिस्टर, बिले,इ पॉश मशीन याची‎ तपासणी करून दोन दिवसात‎ खुलासा मागितला आहे‎ .समाधानकारक खुलासा न‎ आल्यास कायदेशीर कारवाई‎ करण्यात येणार असल्याची माहिती‎ तालुका कृषी अधिकारी गोरख‎ तरटे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...