आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:शेतातून बैलजोडी चोरीला

टाकरवण2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथील शेतकरी कांता भुंबे यांची शेतातील बैलजोडी चोरीला गेली आहे.ही घटना बुधवारी रात्री घडली. टाकरवन ते टाकरवन फाटा रस्तावर कांता भुंबे यांचे शेत आहे. तिथेच बाजूला जनावराचा गोठा आहे.

या गोठ्यात त्यांनी नेहमीप्रमाणे बैलजोडी बांधलेली होती. बुधवारी रात्री शेतकरी कांता भुंबे हे शेतात राखणीला नसल्याचा गैरफायदा घेत चोरट्यानी बैलजोडीची चोरी केल्याची घटना घडली. गुरुवारी सकाळी शेतकरी शेतात गेले. मात्र, बैलजोडी दिसून न आल्याने त्यांनी बैलजोडीची शोधाशोध केली. शोध लागला नाही. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शोध घेण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे. बैलजोडी चोरीला गेल्याच्या घटनेने टाकरवण परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...