आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजाआड:विक्रीसाठी गावठी पिस्टल घेऊन आलेला एक जण केला गजाआड

बीड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विक्रीसाठी अवैधपणे गावठी पिस्टल घेऊन आलेल्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. धामणगाव (ता.आष्टी) येथे ही कारवाई करण्यात आली. एलसीबी पी आय सतीश वाघ यांनी याबाबत माहिती दिली.

जिल्ह्यात अवैध शस्त्रावर कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिलेले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आष्टी तालुक्यातील धामणगावमध्ये एक व्यक्ती अवैध गावठी पिस्टल विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती मिळाली हाेती.

यावरुन पी आय सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संजय तुपे, कर्मचारी अशोक दुबाले, कैलास ठोंबरे, नासेर शेख यांनी सापळा रचला. पिस्टल विक्रीसाठी आलेल्या शाहुराज उर्फ शाहू बाबासाहेब कोकरे (२२, रा. घाटापिंप्री ता. आष्टी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल जप्त केले गेले. या प्रकरणी अंभोरा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शाहूवर १० गुन्हे नोंद दरम्यान, अवैध पिस्टल विक्री दरम्यान पकडलेला शाहू कोकरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चोरीचे ५, जबरी चोरीचे ४ तर दरोड्याच्या तयारीचा एक गुन्हा यापूर्वीच नोंद असून अवैध शस्त्रांसंबंधीचा हा ११ वा गुन्हा नोंद झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...