आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​एसपी नंदकुमार ठाकूर यांची कारवाई‎:3 लाखांची लाच मागणारा‎ पोलिस कर्मचारी निलंबित‎

बीड‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाखल गुन्ह्यात जामीनासाठी व तपासात मदत करण्यासाठी ३‎ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या गेवराई पोलिस ठाण्यातील‎ पोलिस कर्मचाऱ्याला सोमवारी पोलिस अधीक्षक नंदकुमार‎ ठाकूर यांनी सेवेतून निलंबित केले. सादिक सिद्दीक असे‎ निलंबीत करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ताे‎ गेवराई पोलिस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत होता. नोव्हेंबर‎ २०२२ मध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्यात जामीनाला व तपासात‎ मदत करण्यासाठी त्याने आरोपीच्या नातेवाईकाकडे ३ लाख‎ रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

याबाबत लाचलुपत‎ विभागाच्या छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयात तक्रार‎ केली होती. यानंतर लाच मागणी पडताळणी झाली होती मात्र,‎ सापळा यशस्वी झाला नव्हता. मात्र, लाच मागितल्याचे स्पष्ट‎ झाले होते. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद‎ करण्यात आला होता. सोमवारी पोलिस अधीक्षक नंदकुमार‎ ठाकूर यांनी सादिक सिद्दीक याला सेवेतून निलंबीत करण्याचे‎ आदेश दिले.‎

बातम्या आणखी आहेत...